शिराळा: कार्यकर्त्यांनी आपला स्वाभिमान कायम जपला पाहिजे.या विधानसभा मतदार संघासाठी आपणाला १९९५ पूर्वीचे दिवस आणायचे आहेत.त्या साठी आपल्या विचारांच्या लोकांची पुन्हा एकवेळ मजबूत फळी उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
शिराळा येथे भाजप कार्यालयात कापरी ता.शिराळा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.त्यांच्या स्वागत प्रसंगी बोलत होते. यावेळी रणजितसिंह नाईक,सम्राट शिंदे,भाजप तालुकाध्यक्ष सत्यजित पाटील, शिराळा शहर अध्यक्ष कुलदीप निकम.अशोक गायकवाड,भीमराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, आपण नवा आणि जुना कार्यकर्ता असा कधीच भेदभाव करत नाही.प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो.त्याच्या ताकदी प्रमाणे तो पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील असतो.त्यामुळे इथे नवा,जुना असा भेदभाव न ठेवता आणखी आपल्या विचाराशी सहमत असणऱ्या आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवायचा आहे.त्या साठी एकजुटीने काम करा.आपल्या या मतदार संघाला विकासात्मक दृष्टीने एका चांगल्या उंचीवर घेवून यायचं आहे.
प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भाजपा मध्ये प्रवेश केलेल्या माजी उपसरपंच संदीप पाटील यांचा सत्कार आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक सम्राट शिंदे यांनी केले. यावेळी माजी सरपंच अर्जुन पाटील,उपसरपंच ज्ञानदेव पाटील,सर्जेराव पाटील,बाळासो पाटील,शंकर पाटील,सचिन पाटील,निलेश पाटील,मानसिंग पाटील,राजाराम पाटील,विक्रम शिंदे,अर्जुन पाटील उपस्थित होते.आभार कुलदीप निकम यांनी मानले.
0 Comments