शिराळा,ता.५:आमदार सत्यजित देशमुख यांनी योग्य तोडगा काढल्याने भाटशिरगाव (ता.शिराळा) येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे शिराळा पंचायत समिती समोर सुरु असलेले बेमुदत ठिय्या आंदोलन अखेर ६ व्या दिवशी मागे घेण्यात आले.
१६ जून रोजी भाटशिरगावच्या ग्रामपंचायत कार्यालयास बेकायदेशीररित्या टाळे ठोकणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी यांनी गुन्हे दाखल करावे या मागण्यांसाठी ३० जून पासून शिराळा पंचायत कार्यालया समोर आंदोलन सुरू होते.३ जुलै रोजी ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे यांनी ५ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.मात्र उर्वरित ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी ग्रामस्थांची ठाम मागणी असल्याने ठिय्या आंदोलन सुरू होते.आमदार सत्यजित देशमुख यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.यानंतर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आमदार देशमुख यांनी ग्रामपंचायत अधिकारी,पंचायत समिती व पोलीस प्रशासनाशी चर्चा केली.या चर्चेतून निघालेल्या तोडग्याप्रमाणे ग्रामपंचायत अधिकारी यांनी अजून ०७ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत लेखी जबाब शिराळा पोलीस ठाण्यात दिला.सरपंच भगवान भंडारे यांनी सदर घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष दिली.यानुसार ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्याबद्दल एकूण १२ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी आमदार देशमुख म्हणाले,शासकीय कार्यालयांना बेकायदेशीरपणे टाळे ठोकण्यासारख्या घटना घडल्याने असा पद्धतीचा चुकीचा पायंडा पडू नये यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी.ग्रामपंचायतीच्या बाबतीत काही गुन्हे घडल्यास गुन्हा दाखल करण्याबाबतची जबाबदारी ठरविणारे निश्चित धोरण ठरविण्यासाठी विधिमंडळाच्या पातळीवर प्रयत्न करू.भाटशिरगावमध्ये सलोखा समितीची लवकरच बैठक घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना पोलीस प्रशासनाला दिली.युवक क्रांतीचे समन्वयक कैलास देसाई यांनी आंदोलकांच्यावतीने ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी नगरसेवक केदार नलवडे यांनी आंदोलनास भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ,पोलीस उपनिरीक्षक राहुल अतिकिरे,सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, के.डी.पाटील,रणजितसिंह नाईक,विस्तार अधिकारी मनोज जाधव,दुर्गाताई नाईक,देवेंद्र धस,सरपंच भगवान भंडारे, उपसरपंच संजय देसाई,ग्रामपंचायत अधिकारी सचिन मोरे, सदस्या कमल देसाई, शोभा देसाई,वैशाली आलुगडे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सर्जेराव देसाई, माजी अध्यक्ष भिमराव देसाई, बाजीराव देसाई, दिनकर देसाई, बाबुराव देसाई, सेवा सोसायटीचे संचालक दत्तात्रय पाडळकर, अजित देसाई, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल आलुगडे, सतीश देसाई, सागर देसाई, संपत देसाई, अर्जुन आलुगडे, नाना देसाई, राहुल देसाई, महादेव देसाई, अंकुश देसाई, सतीश अस्वले, लक्ष्मी देसाई, शांताबाई अस्वले, मंगल भंडारे, अंजना भंडारे, सुरेखा देसाई, अपर्णा देसाई, सविता देसाई, प्रिया देसाई, स्वाती देसाई, मनिषा देसाई, विमल देसाई, पूजा देसाई, शनिराज आलुगडे, संभाजी जगताप, राजेंद्र भंडारे, शनिराज आलुगडे, ओंकार देसाई, प्रसाद देसाई, सिद्धांत देसाईयांच्या सह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments