शिराळा :यावर्षी ११ मे पासून मॉन्सून पूर्व पावसाने सुरुवात करून सर्वाना बेजार केले आहे.याचा सर्वाधिक फटका हा खरीप पिकासाठी शेतकरी वर्गाला बसला आहे. जून महिन्यात चांदोली परिसरात आता पडलेल्या पावसाची व गत चार वर्षातील आकडेवारी पाहता दुप्पट ते दहा पटीने अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसाने शेतीचे वेळापत्रकच बदलून टाकले आहे. या पावसामुळे तालुक्यातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.२०२१ ला जून महिन्यात फक्त दोन वेळा अतिवृष्टी झाली होती.चार वर्षात नंतर पुन्हा या वर्षी जून २०२५ मध्ये एका महिन्यात सहावेळा अतिवृष्टी झाली आहे. या वर्षी कोकरूड २,शिरशी १ ,चरण मंडलमध्ये ४ वेळा अतिवृष्टी झाली आहेत. जून २०२१ मध्ये १७ जूनला १८५ तर जून २०२५ मध्ये १७ जूनला ११३ तर २५ जूनला १०३ मी.मी. पावसाची नोंद झाल्याने पावसाने अतिवृष्टीची शंभरी पार केली आहे. २ जून व नंतर ६ ते १० जून सलग पाच दिवस असे एकूण सहा दिवस पावसाने उघडीप दिली होती.त्या नंतर ११ मे च्या दुपार पासून कायम चादोली परिसरात पावसाची सुरुवात झाली ती अद्याप सुरूच आहे. गेल्या पाच वर्षात १२ ते २३ दिवस पाऊस पडला आहे. पाच वर्षात फक्त एकवेळ २०२१ मध्ये १७ जूनला १८५ मी.मी.असा सर्वाधिक पाऊस झाला आहे.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात भरले मध्यम प्रकल्प व ल.पा.तलाव
२० जून चा पाणीसाठा व कंसात गत वर्षाचा पाणी साठ टक्केवारीत
मोरणा मध्यम प्रकल्प -१०० (११ )
ल.पा.तलाव वाकुर्डे बुद्रुक-१०० (८८ )
ल.पा.तलाव अंत्री बुद्रुक-१०० (२९ )
ल.पा.तलाव शिवणी -१०० (०)
ल.पा.तलाव टाकवे -१००(१५ )
ल.पा.तलाव रेठरे धरण-१०० (२)
ल.पा.तलाव कार्वे भरणे अद्याप बाकी आहे.
जूनमध्ये झालेला एकूण पाऊस: वर्ष व कंसात एका महिन्यात झालेला पाऊस मी.मी.मध्ये
जून २०२१ (५४०)
जून २०२२ (१०८)
जून २०२३ (१३३)
जून २०२४ (५०५)
जून २०२५ (१०८०)
पाच वर्षात झालेली अतिवृष्टी .तारीख व कंसात झालेला पाऊस मी.मी.मध्ये
जून२०२१ - १७ (१८५ ),१८ (८०)
जून २०२५ -१७ (११३ ),१८ (६९ ),१९ (९९),२० (७१ ) ,२४ (७७ ),२५ (१०३ ),
या वर्षी जून मध्ये मंडल निहाय झालेली अतिवृष्टी . तारीख व कंसात झालेला पाऊस मी.मी.मध्ये
कोकरूड -२१ (६७.५ ),२५ (९०.३ ).
शिरशी १३ (६५.३ )
चरण -१६ (६५.५ ),२१ (६५.५ ),२५ (९४ ),३० (६६.५ ).
वर्ष निहाय जून महिन्यात पडलेल्या पावसाचे दिवस
जून २०२१ (२२ )
जून २०२२ (१२ )
जून २०२३ (१३)
जून २०२४ (२०)
जून २०२५ (२३)


.jpg)

0 Comments