शिराळा,ता.२४:निवडणुका या सूड किंवा बदल्याच्या भावना ठेवून लढायच्या नसून विकासाच्या दृष्टीकोनातून लढल्या पाहिजेत.शिराळ्याला विकासातून देशाच्या नकाशावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करूच.पण आता घड्याळ्यात १०वाजून दहा १० नव्हे तर १२ वाजवत आपल्या विजयाने सर्वांची तुतारी वाजवू असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
शिराळा येथील लक्ष्मी चौकात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत बोलत होते.यावेळी मंत्री सामंत म्हणाले,शिराळ्याच्या विकासाची दिशा ठरवा.घन कचरा प्रकल्पास जागा देऊ.विकासात कोणते ही राजकारण असू नये.शिराळा औद्योगिक वसाहती मध्ये उद्योग आणून महिलांना सहा महिन्यात रोजगार उपलब्ध करू देण्या बरोबर तरुणांच्यासाठी रोजगार प्रशिक्षण देऊ.
खासदार धैर्यशील माने म्हणाले,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग यांच्या माध्यमातून विकासाला चालना द्यायची आहे.विकास कामात अग्रेसर असणाऱ्या आमदार सत्यजित देशमुख यांना अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी आपले या निवडणुकीत चिन्हच बदलले.त्यांना विकास नको फक्त राजकारण करायचं आहे.संभाजी महाराज यांचे स्मारक आम्ही पूर्ण ताकदीने पूर्णत्वास नेणार आहे.विकासाच्या वाटेला शिराळा जोडा,औद्योगिक वसाहती मध्ये उद्योग आणून तरुण व महिलांच्या हाताला रोजगार द्या अशी मागणी खासदार माने यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली.
आमदार सत्यजीत देशमुख म्हणाले,संभाजी महाराज स्मारकाबाबत विरोधक चुकीची दिशाभूल करत आहेत.नागपंचमीसारख्या परंपरेशी जोडलेल्या भावना युती सरकार जाणून आहे.पूर्वीप्रमाणे नागपंचमी उत्सव चालू होणार तसेच शिराळ्यामध्ये विकासाच्या विविध योजना राबवल्या जातील.
उमेदवार पृथ्वीसिंग नाईक म्हणाले,शिराळा गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहो.आपले मत विकासासाठी द्या.तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही.
यावेळी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,संपतराव देशमुख,पै.चंद्रहार पाटील,गौरव नायकावडी,भगतसिंग नाईक,विश्वास कदम,विश्वप्रतापसिंग नाईक,हणमंतराव पाटील,सुखदेव पाटील,के.डी.पाटील,केदार नलवडे,महेश पाटील,बसवेश्वर शेटे,रमेश कांबळे,सम्राट शिंदे,उत्तम निकम,कुलदीप निकम,संतोष इंगवले उपस्थित होते.
दाढी पांढरी; मी तरुण
खासदार माने यांनी सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,भगतसिंग नाईक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक यांच्या दाढीचा विनोदी उल्लेख करत पांढरी असली तरी काळी केलेली माझी दाढी असे स्वतःला ही बोलले.त्यावेळी त्वरित प्रतिक्रिया देताना सामंत म्हणाले,“माझी दाढी पांढरी असली तरी मी अजून तरुण आहे!”त्यावेळी सभेत जोरदार हास्याची लाट उमटली.शेवटी सामंत म्हणाले,“हे राज्य दाढीवाल्यांचेच आहे!”
विरोधकांवर निशाणा साधताना सामंत म्हणाले “शिराळा हा सापा साठी प्रसिद्ध असला तरी या सापामध्ये काही जाती उपद्रवी असतात त्यांना सोबत घ्यायचे नसते. ऐनवेळी पक्ष सोडून जाणाऱ्यावर त्यांनी हल्ला चढवला.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .






.jpg)
0 Comments