शिराळा ,ता.२३ :शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असताना हवामानातील बदलामुळे पडलेली कडाक्याची थंडी मात्र अचानक गायब झाली आहे. राजकारणात उमेदवारी, फेरबदल, पक्षांतरण, गुप्त बैठका, घराघरांचा प्रचार या सगळ्यांनी निवडणुकीची रणधूमाळी कमालीची वाढली आहे. प्रत्येक पक्षात प्रचारासाठी नेत्यांची लगबग सुरू आहे. प्रभाग निहाय कार्यकर्त्यांच्या बैठकीने वातावरणनिर्मितीला गती आल्याने राजकीय तापमान शिगेला पोहोचले आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची चुरस लक्षवेधी बनली असून प्रत्येक घोषणा, पोस्टर आणि प्रचारयोजना वातावरणात अतिरिक्त गरमी निर्माण करत आहे.
मात्र दुसरीकडे हवामानाने अचानक कलाटणी घेतली आहे. दिवाळीनंतर सुरू झालेली कडाक्याची थंडी काही दिवस चांगली जाणवत होती; परंतु गेल्या दोन–तीन दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे. सकाळचा गारवा कमी झाला असून पहाटेच्या वेळेला जाणवणारी थरथरही जवळजवळ नाहीशी झाली आहे. दवाचे प्रमाण कमी झाले असून दिवसाढवळ्या उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. राजकीय तापते वातावरण आणि नैसर्गिक उष्णतेतील वाढ या दोन भिन्न पण एकाच वेळी जाणवणाऱ्या घडामोडींमुळे शिराळा तालुक्यात एक वेगळेच चित्र दिसू लागले आहे. मतदारांमध्ये चर्चा, सोशल मीडियावरील पोस्ट, बैठका यांच्या उष्णतेबरोबर हवामानातील उबही जाणवू लागल्याने तालुक्यातल्या गप्पांचे विषयही दुप्पट तापले आहेत. आगामी काही दिवसांत निवडणूक आणि हवामान — दोन्ही कसे बदलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज माघारी नंतर शिराळा नगरपंचायत मध्ये आपला पत्ता कट झाल्याने अथवा संधी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी आपली नेत्या वरील असणारी श्रद्धा बाजूला ठेवून पक्षाला रामराम करत करत दुसऱ्या पक्षात प्रवेश करून नवीन घरोब्याला सुरुवात केली आहे.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments