शिराळा,ता.२३:राज्याच्या तिजोरीची चावी आमच्याकडे असून शिराळ्यात आम्ही निधी आणला असे कोण म्हणत असेल तर तिजोरीची किल्ली कोणाकडे असली तरी ती वापरण्याची परवानगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.त्यांच्या नजरेत दरारा आहे.केंद्रात,राज्यात,तालुक्यात आपली सत्ता आहे.आता शिराळ्यात नगरपंचायत मध्ये सत्ता आणा.विकासाला निधी कमी पडणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
शिराळा येथे शिराळा नगरपंचायत निवडणूकीच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी मंत्री पाटील म्हणाले,शुभारंभ रॅलीत फिरताना मला आतून फिलिंग झाल्याने आपले १७ उमेदवार निवडून येतील.पंतप्रधान मोदीजी हीच तुमची गॅरंटी आहे.त्या पक्षाचे हे शिलेदार आहेत.तुमची विकासाची असणारी मागणी पूर्ण करण्यासाठी मी पाठीशी आहे.रस्ते,गटार म्हणजे विकास नव्हे तर गावात समृद्धी कसे वाढेत हे पाहणे म्हणजे विकास आहे.त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचं आहे.शिराळा शहरात,व्यापार,रोजगार,कसा वाढेल यासाठी प्रयत्न करा.
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले,मला आज आमदार होऊन एकवर्ष पूर्ण झाले आहे.या एकवर्षात आम्ही केलेल्या कामांनी विरोधकांची भांबेरी उडाली असल्याने त्यांनी तुतारीत पाणी सोडून घड्याळची टिकटिक सुरु केली आहे.हीच आम्ही एकवर्षात केलेल्या कामाची खरी पोहच पावती आहे.मी कोणाच्या आडवा जात नाही.पण जो आडवा येईल त्याला आडवा करू.विरोधक लखोबा लोखंडे यांची भूमिका बजावत आहेत.आम्ही तयार केलेला पैलवान त्यांनी आयात करून आमच्या समोर उभा केला आहे.नगरपंचायत इमारत द्या.शक्तिपीठ शिराळ्यातून गोव्याकडे घेऊन जावे अशी मागणी देशमुख यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले,तालुक्यात अनेकवर्षे फसवेगिरीचे राजकारण सुरु आहे.आता ज्या व्यासपीठावर मानसिंगराव नाईक आहेत तिथे तुतारी नव्हे तर घड्याळ दिसत आहे.ज्यांना आपल्या पक्षाचे व्हिजन नाही ते या तालुक्याचा विकास काय करणार.त्यांचे नेमके चिन्ह कोणते हेचं कळतं नाही.
यावेळीनगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक म्हणाले,शिराळाच्या समस्या अनेक आहेत.त्या सोडवण्यासाठी आम्हाला साथ द्या.शिराळा शहरातचा विकास करण्यासाठी कामा करणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी रहा.विरोधकांनी तुतारी चिन्ह बाजूला ठेवून भांडणे लावायचा उद्योग केला.त्यांना जनता थारा देणार नाही.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार,ॲड.भगतसिंग नाईक,हणमंतराव पाटील,के.डी.पाटील,विश्वास कदम,सम्राट शिंदे,पृथ्वीसिंग नाईक,केदार नलवडे,उत्तम निकम,महेश पाटील, सचिन शेटे उपस्थिती होते.
सम्राट तू काळजी करू नकोस.एप्रिल मध्ये सम्राटचा मोठ्या सत्कार करायचा आहे.सम्राट तू काळजी करू नकोस असे म्हणून एप्रिल २०२६ ला सम्राट महाडिक यांना कोणती संधी मिळणार याची उत्सुकता लोकांच्या मनात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या भाषणातून निर्माण केली आहे.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments