शिराळा,ता.२३:शिराळा नगरपंचायतिच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून केले जाईल.त्यासाठी या निवडणुकीत पक्षाच्या पाठीशी ताकद उभी करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी येथे केले.
शिराळा येथे नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलत होते.यावेळी तटकरे म्हणाले,शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक एकत्रित आल्यामुळे या पुढील चित्र बदललेले दिसेल.लाडकी बहीण योजना ही अजितदादा पवार यांनी आणली.शिराळ्याच्या विकासाच्या कल्पकतेला जोड देण्यासाठी शिराळा नगरपंचायत मध्ये आपली सत्ता येणे गरजेचे आहे.लाडकी योजना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आणली.विकासाच्या कल्पकतेला जोड देण्यासाठी आपली सत्त्ता गरजेची आहे.शिराळयाच्या निकालचा गाजर मी ऐकेल अशी माझी खात्री आहे.
माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले,विकासासाठी आलेला निधी मागे घालवणाऱ्या व संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या आड येणाऱ्या प्रवृतीकडे नगरपंचायतची सत्ता देणार का याचा विचार करा.ते घड्याळ चिन्हा बाबत टीका करत असले तरी तिकडे लक्ष न देता आपण विकासाला प्राधान्य द्याचे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाला अर्थ मंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच निधी दिला.त्याचे श्रेय कोणी घेऊ नये.
रणधीर नाईक म्हणाले,नागपंचमीबाबत मत कलुशीत केले जाईल.त्याबद्दल आम्ही प्रभाग निहाय भूमिका सांगत आहे.आम्ही केलेल्या कामावर आम्हाला मत द्या.ही निवडणूक १८-०करायची आहे.
विराज नाईक म्हणाले,प्रत्येक प्रभागात आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान झाले पाहिजे.विरोधक एक मत मागत आहेत.त्यामुळे काळजी घ्या.आपल्या नेत्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर मतदान मागा.लोकं तुम्हाला सहकार्य करतील.
यावेळी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक,जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, लतिफ तांबोळी, सम्राटसिंह नाईक,प्रमोद नाईक,अभिजित नाईक,भूषण नाईक,सुनिता नाईक,अश्विनी नाईक,वैशाली नाईक,सर्व उमेदवार उपस्थित होते.
मानसिंगराव यांच्या मर्मावर बोट ठेवत जयंतरावांच्यावर निशाणारात्री बारा वाजता केलेल्या फोनच्यावेळी मानसिंगराव नाईक तुम्ही ऐकले असते तर आज तुम्ही आमदार असता.तुम्ही कोणाच्या प्रेमापोटी थांबला हे माहिती नाही.पण ज्यांच्यासाठी थांबला त्यांनीच तुम्हाला तोंड घशी पडले हे मी गाडीत निशिकांत पाटील यांच्याकडून ऐकले आहे.त्यामुळे झालेली चूक सुधारून न ऐकण्याची चूक मानसिंगराव पुन्हा करू नका.मी हे का बोलतोय हे सर्वांना माहिती आहे असे म्हणून प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी नाईक यांच्या मर्मावर बोट ठेवत नाव न घेता जयंतराव पाटील यांच्यावर निशाणा साधला.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments