शिराळा,ता.१८ : शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्ते विश्वास उर्फ बंडा कदम व सचिन चंद्रकांत शेटे यांनी घेतलेली पक्षविरोधी भूमिका मान्य नसून आम्ही त्यांना करणे दाखवला नोटीस दिली आहे. ही माहिती तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले की, शिराळा ग्रामपंचायत व नंतर नगरपंचायतीवर शिराळा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे प्रमुख नेते मा. मानसिंगराव नाईक यांची सत्ता आहे. ती २०२५ निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांची आघाडीने लढवत आहे. त्याचे नेतृत्व माजी राज्यमंत्री मा. शिवाजीराव नाईक व मा. मानसिंगभाऊ करत आहेत. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका ही पक्षातील सर्व उमेदवारांच्या विजयासाठी सर्वंकष प्रयत्न करणे, अशी असलीच पाहिजे.
पक्षाच्या भूमिकेशी निष्ठा न ठेवता श्री. विश्वास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार विरोधात लढणाऱ्या विरोधी पक्षातील त्यांच्या जावयास पाठिंबा दिला अथवा प्रचार करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. याबाबत वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली आहे. तसेच सचिन शेटे यांनी अशीच भूमिका घेतली आहे. श्री. कदम व श्री. शेटे यांच्यावर पक्षविरोधी भूमिकेबद्दल कारवाई करण्याबाबत तालुकाध्यक्ष या नात्याने मला वरीष्ठांनी कळविले आहे. त्यानुसार नेते श्री. मानसिंगभाऊ व इतर सहकाऱ्यांना चर्चा करून त्यांना करणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याबाबत समाधानकारक खुलासा न आल्यास पुढील कठोर कारवाई करण्यात येईल.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .




.jpg)
0 Comments