शिराळा: नगरपंचायत निवडणुकीत माजी नगरसेवकांच्या पुनरागमनाची जोरदार चुरस दिसत आहे.यंदा अभिजित नाईक, केदार नलवडे, उत्तम डांगे, संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे, सीमा कदम, नेहा सुर्यवंशी, सुनंदा सोनटक्के आणि अर्चना शेटे अशा गत वेळच्या १७ व स्वीकृत २ अशा १९ पैकी ९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पुन्हा एकदा राजकीय रिंगणात उडी घेतली आहे. यामध्ये दोन माजी नगराध्यक्षा महिलांचा समावेश आहे. एकूण नऊ जणांचा या यादीत समावेश असला तरी सर्वांना पुन्हा संधी मिळेलच असे निश्चित नाही.नवे राजकीय समीकरण,पक्षांचे गणित,आघाड्या-बिघाड्यांचा प्रभाव आणि अंतर्गत गटबाजी यामुळे अंतिम तिकिटांचे गणित खूपच गुंतागुंतीचे होणार आहे.माजी सदस्यांची मोठी फौज मैदानात उतरल्यानं शिराळ्यातील निवडणूक अधिक रंगतदार होईल असे प्राथमिक चित्र असले तरी आता अंतिम यादीत नेमके जुने किती अनुभवी चेहरे टिकणार आणि नवीन कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या कार्यकाळात नगरसेवकांनी प्रभावी कामगिरी करून मतदारांमध्ये आपली ओळख टिकवून ठेवली आहे. विशेषत: काही प्रभागांत चांगले काम केल्याने त्यांची पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.या नऊ जणांपैकी प्रत्यक्षात किती जणांना पुन्हा संधी मिळणार, हे ठरवताना राजकीय समीकरणे, गटबाज्या, पक्षांतील अंतर्गत आरक्षण, स्थानिक पातळीवरील नाराजगी – गोडीगुलाबी या सर्वांचा मोठा प्रभाव राहणार आहे. काही माजी नगरसेवक आपला प्रभाग बदलून पुन्हा संधी शोधत आहेत, तर काही जण संघटनात्मक सामर्थ्यावर आणि शेवटच्या पाच वर्षांत केलेल्या कामांच्या बळावर पुनर्निवड होण्याचा आत्मविश्वास व्यक्त करताना दिसत आहेत.राजकीय निरीक्षकांच्या मते, या नऊ जणांपैकी किमान तीन ते चार माजी नगरसेवकांची पुनरावृत्ती निश्चित मानली जात आहे. काहींची कार्यशैली, मतदारांमधील स्वीकारार्हता आणि प्रभागातील मजबूत संघटन यांचा त्यांना निश्चित फायदा होणार आहे.
महायुती, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना गट या सर्वांकडून तिकिटांचे वाटप करताना नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाईल असा सूरही काही ठिकाणी ऐकू येतो. त्यामुळे जुन्या अनुभवासमोर नव्या चेहऱ्यांची मागणी उभी ठाकल्याने तिकिटांसाठी स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे. काही पक्षांत महिलांच्या आरक्षणाच्या प्रभागांत माजी नगरसेविका असल्या तरी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचा विचारही सुरू आहे. अनेकांच्या पुनरागमनाला पक्षांतर्गत समीकरणांचा मोठा अडथळा ठरू शकतो.यासाठी ताज्या चेहऱ्यांना, युवकांना आणि सामाजिक स्तरावर सक्रिय असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .




.jpg)
0 Comments