शिराळा :१४ नोव्हेंबर २०२५ :विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातर्फे सन २०२५-२६ हंगामात गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला ३ हजार ५०० प्रतिटन प्रमाणे दर दिला जाईल, अशी माहिती अध्यक्ष श्री. मानसिंगराव नाईक यांनी दिली. संचालक मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते.
अध्यक्ष नाईक म्हणाले,‘विश्वास’चे नेहमी सभासद, ऊस उत्पादकांची हित जोपासले आहे. प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त ऊस दर देण्याचा प्रयत्न केला आहे. साखर कारखानदारीबाबत केंद्र सरकारचे धोरण सकारात्मक नाही. उसाला दिला जाणारा प्रतिटन दर, तोडणी-वाहतूक, प्रक्रिया खर्च व बाजारात मिळणारी साखरेची किंमत याचा मेळ बसत नाही. ज्या पद्धतीने ऊस खरेदीचा दर वाढला गेला त्याप्रमाणात साखरेची विक्री किंमत न वाढवल्यामुळे प्रसंगी कारखान्यांना तोटा सहन करावा लागत आहे. ‘विश्वास’चे गेल्या वर्षी गाळपासाठी आलेल्या उसाला ३ हजार २७५ रुपये दर दिला आहे. हा दर एफ. आर. पी. पेक्षा १४१.६८ रुपये जास्त आहे.‘विश्वास’मध्ये होणारी उपपदार्थ निर्मितीमधून उसाच्या दराची सांगड घातली जात आहे. त्यातच पावसच्या लहरीपणाचा फटका दरवर्षी ऊस उत्पादकांना व कारखानदारांना बसत आला आहेत. यावर्षी तर ८ मे पासून पावसाने सुरुवात केली. तो ऑक्टोंबर अखेरीपर्यंत होता. उसाला पोषक थंडी असते, त्याची सुरुवात आता झाली आहे. त्यात उसाची पळवा पळवी वाढली आहे. संचालक मंडळाने सर्व गोष्टींचा सारासार विचार करून यावर्षी उसाला प्रतिटन ३ हजार ५०० देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांनी आपण पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे. नोंदीनुसार तोडणी-वाहतूक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. तोडलेला ऊस सत्वर गाळपास येईल, याची काळजी शेती विभाग घेत आहे.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments