शिराळा नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस चुरशीची होत असून आता प्रचाराला घराघरांत ऊत आला आहे.उमेदवारांनी जाहीर सभा, कोपरा सभा यापेक्षा मतदारांच्या वैयक्तिक गाठी-भेटींना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे.प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याची हमी देत उमेदवार मतदारांच्या विश्वासाचा गहिरा पाया रचण्याचा प्रयत्न करत आहेत.
नगराध्यक्षपद तसेच नगरसेवकपदासाठीचे उमेदवार सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विविध प्रभागांत भेटी देत असून, स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि तरुण मंडळी यांच्यासह तळागाळात प्रचार मोहीम राबवत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत सोशल मीडियासोबतच थेट दारोदार फिरून केले जाणारे वैयक्तिक संपर्क अभियान अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.प्रत्येक घरात जाऊन मतदारांचे प्रश्न ऐकणे, परिसरातील विकासाच्या उणिवा नोंदवणे, तसेच आगामी पाच वर्षांसाठी आपले कार्यनियोजन सांगणे यावर भर दिला जात आहे. काही उमेदवार महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदार यांच्यावर विशेष लक्ष केंद्रित करत आहेत. तर काही ठिकाणी विकासकामांची माहिती पत्रके, प्रभागानुसार केलेली योजनांची रूपरेषा मतदारांपर्यंत पोहचवली जात आहे.अर्ज माघारी पासून प्रचाराला वेग आला असून पुढील काही दिवसांत वातावरण अधिक तापणार आहे. नव्या मतदारांची संख्या लक्षणीय वाढल्याने सर्वच पक्षांनी त्यांच्या पसंतीसाठी प्रयत्नांची शर्थ केली आहे. शिराळ्यातील स्थानिक मुद्द्यांवर आधारित व थेट लोकांपर्यंत पोहचणारी ही वैयक्तिक भेट मोहीम निवडणुकीत निर्णायक ठरणार, आहे. घराघरांत सुरू झालेल्या या मोहीमेमुळे शिराळा नगरपंचायतीत निवडणूक रंगतदार व चुरशीची होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
व्यथा सर्वसामान्य कुटुंबाची ............अवश्य पहा ....
View this post on Instagram
Running Text सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .





.jpg)
0 Comments