BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गावी येणाऱ्या बांधवांशी भेदभाव करू नका त्यांची काळजी घ्या-माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख


शिराळा: व्हिडिओ कॉन्फरन्सद्वयारे अधिकारी व सरपंच यांचेबरोबर संवाद साधताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक  व सत्यजित देशमुख

गावी येणाऱ्या बांधवांशी भेदभाव करू नका त्यांची काळजी घ्या-माजी मंत्री शिवाजीराव नाईक व सत्यजित देशमुख

शिराळा,ता.१०: मुंबई , पुण्याहून व इतर ठिकाणाहून  आलेल्या बांधवांशी भेदभाव करू नका . त्यांची काळजी घ्या असे आव्हान माजी मंत्री शिवाजीराव नाईक , व सत्यजीत देशमुख यांनी
शिराळा ,वाळवा तालुक्यातील  तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक ,कार्यकर्ते व आशा  स्वयंसेविकानशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून केले.
 यावेळी ते म्हणाले, परगावाहून येणाऱ्या लोकांना परवानगी देण्याचा निर्णय शासनाने  घेतला आहे. पुण्या-मुंबईहून काही बांधव गावाकडे येत आहेत. कोरोनामुळे  त्यांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे . पुण्या- मुंबई मध्ये अडकलेल्या लोकांविषयी विषयी शासनाने धोरण शिथिल केल्यामुळे गावाकडे येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. गावातील लोकांची जबाबदारी वाढली आहे. प्रशासनामार्फत तालुक्याच्या सीमारेषेवर तपासणी करून होम कोरंनटाइमच्या शिक्का मारून सोडणार आहे.  त्यांना शाळा खोल्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी.  प्रांताधिकारी नागेश पाटील,  तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ अनिल बागल,  सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण पाटील ,डॉ विलास रावळ,  जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख,पंचायत समिती उपसभापती पी. वाय. पाटील, पंचायत समिती सदस्या सौ सारिका पाटील,सरपंच,पोलीस पाटील,ग्रामसेवक यांनी या चर्चेत भाग घेतला होता.

Post a Comment

0 Comments