BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लोकांच्या मदतीला धावली.एन.एस.एस.ची तरुणाई


लोकांच्या मदतीला धावली.एन.एस.एस.ची तरुणाई


शिराळा:११: चिखली (ता शिराळा) येथील देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालयाचे एन.एस.एस चे विद्यार्थी कोरोना समाजकार्यात उतरले असून त्यांनी  तालुक्यातील विविध गावात भाजीपाला वाटप, जनजागृती, मास्कचे वाटप असे विविध उपक्रम राबविले.
 चिखली महाविद्यालय नेहमी सामाजिक कार्यातही अग्रेसर असते..आपत्ती काळातही सामाजिक बांधिलकी जपली आहे .सध्या कोरोना संकटातही  लोकांच्या मदतीला महाविद्यालयाचे एन.एस.एसचे विद्यार्थी व शिक्षक धावले आहेत .
मांगले येथे प्रा.दीपक तडाखे यांनी स्वखर्चाने भाजीपाल्याचे वाटप केले. अंत्री येथे मोहन पाटील, प्राजक्ता कासार, मनीषा घेवदे यांनी नागरिकांना आरोग्य सेतू ॲप व मस्कचा वापर याबाबत घरोघरी मार्गदर्शन केले . कांदे येथे प्रा. स्नेहल पाटील, आशा परीट यांनी ग्रामपंचायत समोर रांगोळी रेखाटून जनजागृती केली. नारायण पाटील यांनी स्वतः च्या शेतातला भाजीपाला बैलगाडीतून फिरून गरजूंना मोफत वाटला .
कणदूर, पुनवत, खवरेवाडी, शिराळे खुर्द, फुपेरे येथे महाविद्यालयाचे विद्यार्थी सुनील कारंडे,नरेंद्र घेवदे, दिकल पवार, अभिजित पाटील, स्नेहल पाटील यांनी ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून औषधफावरणीचे समाजकार्य केले .

      स्नेहल अग्रेसर


     कणदूर येथे स्नेहल पाटील हिने दिवसभर औषध फवारणी पंप वागवून फवारणी केली व स्त्री कर्तृत्वाचा आदर्श उभा केला .तिच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले .सर्व विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष अमरसिंह नाईक, प्राचार्य डॉ एस आर पाटील, नोडल अधिकारी प्रा पी आर माळी यांच्याबरोबर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे .



           

Post a Comment

0 Comments