BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

त्यांनी वाहिली वडिलांना अनोखी श्रद्धांजली

मांगले येथील शेवडे बंधूनी वडिलांच्या वर्षश्राद्धाचा खर्च टाळून जिल्हापरिषद शाळेस एल. इ. डी. भेट दिला.

 श्राद्धाचा खर्च टाळून दिला शाळेला एल.ई. डी.

मांगलेच्या पवार बंधूंचा अनोखा उपक्रम

 मांगले: आपल्या वडिलांच्या द्वितीय वर्षश्राद्ध निमित्त मांगले (ता. शिराळा) येथील पवार बंधूंनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगले या शाळेस ४५ इंची एल. ई. डी. भेट देऊन श्रद्धांजली अर्पण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला.
मांगले येथील कै. बबन पवार हे शेवडे कृषी सेवा केंद्र चालवत होते. दोन वर्षभरापूर्वी त्यांचे निधन झाले. तदनंतर द्वितीय वर्षश्राद्ध निमित्त सामाजिक भावनेतून त्यांचे दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वरहश्रद्धाला गावातील ज्या शाळेत आपण प्राथमिक शिक्षण पूर्ण केले त्या गावासाठी व शाळेसाठी ४५ इंची एल. ई. डी. देऊन एक छोटीशी मदत देऊ करून आपल्या वडिलांच्या स्मृति कायम जागृत ठेवण्याचा आगळावेगळा सामाजिक उपक्रम सर्वांसमोर ठेवला. या पवार बंधू पैकी किरण पवार हे झुआरी कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.प्रवीण पवार हे मांगले येथील शेवडे कृषी सेवा केंद्र चालवतात. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मावती नलवडे,  शिक्षक विश्वास वरेकर, शंकर पाटील, दगडू पाटील, श्रीमती मंदाकिनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, संजय पाटील, प्रकाश गावडे, सौ.  मीनाक्षी सोनार, उद्योजक माणिक शेवडे, आनंदा शेवडे यांनी कौतुक केले.

“आमच्या वडिलांचे वर्षश्राद्ध  घरगुती धार्मिक विधी करून केले.आमच्या वडिलांचे  रुढी-परंपरांसाठी पैसा खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा सामाजिक कार्याला देणगी देण्याला त्यांचे प्राधान्य असायचे. त्यामुळे त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी आम्हाला हाच मार्ग योग्य वाटला. म्हणून आम्ही शाळेला एल.ई. डी.दिला”

किरण व प्रवीण पवार बंधू मांगले


Post a Comment

0 Comments