BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील एकजण कोरोना बाधित


कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील एकजण कोरोना बाधित


 आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे त्वरित उपचाराखाली


 *जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेचे केले कौतुक*

 सांगली दि.५ (जि.मा.का.) मुंबई येथील ट्रक वर काम करणारा एक जण ट्रकमधुन इस्लामपूर येथे आला. तेथून तो टँकरमधून कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी या आपल्या गावाकडे निघाला होता‌ . तथापि मुंबई येथून आल्याने सदर व्यक्तीची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. यावेळी या व्यक्तीची लक्षणे कोरोणा संशयित वाटल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविले. या ठिकाणी असणाऱ्या डॉ . सतीश कोळेकर यांनी त्या व्यक्तीला कवठेमंकाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ डी आर पाटील यांच्याकडे संदर्भित केले. त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेची संपर्क केला असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे सदर व्यक्तीला मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले. काल या व्यक्तीचा स्वाब घेण्यात  आला होता. आज त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून सदर व्यक्ती कोरोणा बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. या व्यक्तीला  त्याच्या गावाकडे जाऊ न देता रस्त्यातच त्याची
 तपासणी केल्याने पुढील अनर्थ टळला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या तत्पर हालचालींबद्दल जिल्हाधिकारी डॉ .अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

2 Comments