शिराळा,ता.२८:संघटना बांधणी करून पक्ष बळकट करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुका ताकतीने लढवू असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी च्या सांगली जिल्हा उपाध्यक्ष वसंत कांबळे यांनी केले.
सांगली येथे वंचित बहुजन आघाडीच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत कांबळे यांची फेर निवड करण्यात आली. त्या प्रसंगी आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते. वंचित चे सांगली जिल्हा अध्यक्ष शंकर माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वसंत कांबळे म्हणाले, आता पर्यंत केलेल्या कामची पोहच पावती म्हणून संघटनेने पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन .सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पोहचवून संघटना बांधणी करण्याचा व पक्ष मजबूत केला जाईल. तरुणांच्यात संघटनेचे महत्व,पक्षाची भूमिका,चळवळीची दिशा, सामाजिक भावनेची वाढ,लोकशाहीत सक्रिय सहभाग, या गोष्टींची पेरणी करून येणाऱ्या प्रत्येक जिल्हा परिषद ,पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीत पक्षास ताकदीने उभा राहील. गाववार आणि तालुकावार पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना बळ देण्याचा सुद्धा येईल .
यावेळी जिल्हा पदाधिकारी अमर माने, अमित बनसोडे, जीवन कतकरे, विजय कांबळे, रणजीत वाकुर्डेकर, आदेश कांबळे, दिनकर पवार यांच्यासह इतर जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments