शिराळा,ता.२१: वार मंगळवार.दुपारी साडे तीन पासून शिराळा तालुक्यात पावसाची सुरुवात झाली.पावसाची संततधार कायम असल्यामुळे मिळेल त्या वाहनाने अथवा मोटारसायकल वरून घरी जाण्यासाठी नोकरी व कामा निमित्ताने बाहेर आलेल्या सर्वांची धडपड सुरु होती. सायंकाळी Shipment सुमारास ऐतवडे बुद्रुक येथील दाऊखान मुल्ला( वय ३०) हा युवक मोटारसायकलवरून घरी जात असताना कापरी येथे कापरी-कार्वे या मुख्यरसत्यावर अचानक त्याच्या चालत्या मोटारसायकलवर झाड उन्मळून पडले. त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या .काय घडले हे क्षणभर कळलेच नाही. भानावर येऊन पहिले असता एक फांदी त्याच्या मागील बाजूवर व दुसरी पेट्रोलच्या टाकीवर दोन्ही फांद्यांच्या मध्ये तो अडकला. मोटारसायकल तशीच उभी होती. त्यामुळे मोटारसायकलचे नुकसान झाले पण त्याचे प्राण वाचले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याची प्रचीती तिथे जमलेल्या ग्रामस्थांना आली.
याबाबत घटनास्थळा वरून समजलेली माहिती अशी, कापरी (ता.शिराळा) येथे कापरी-कार्वे रस्त्यावर शिराळा - आष्टा रस्ता रूंदीकरणासह काँक्रिटीकरण काम सुरु आहे.ते काम सुरु असल्याने रस्ता लागत असणऱ्या झाडांची मुळे तुटली आहेत.काल दुपार पासून शिराळा तालुक्यात मान्सून पूर्व पाऊस सुरु आहे.पावसामुळे जमीन ओळी झाल्याने व रस्त्याच्या कामामुळे झाडाची मुळे तुटली आहेत. दाऊखान राजुद्दीन मुल्ला शिराळ्याकडून ऐतवडे बुद्रुक येथे घरी निघाला होते. सायंकाळी सातच्या सुमारास कापरी येथील समाज मंदिरा जवळ आले असता अचानक त्याच्या चालत्या मोटारसायकलवर झाड उन्मळून पडले. रस्त्याचे काम सुरु असल्याने व एकेरी वाहतून असल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.पावसामुळे रस्त्या उकरला असल्याने मोठ्या प्रमाणत झालेल्या चिखलामुळे अनेक वाहने त्यात अडकली. ही घटना समाज मंदिर येथे असलेल्या तरुणांनी पाहून गावातील अमोल पाटील, प्रदीपकुमार पाटील, संजय पाटील, निलेश पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासह नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान नागरीकांनी कटरच्या सहाय्याने झाड तोडुन रस्त्यातुन बाजुला हटवले. चिखलात अडकलेली वाहने ट्रॅक्टरच्या सहाय्याने ओढुन काढून वाहतुक पूर्ववत केली.पावसाळ्यापूर्वी उकरलेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरीक व वाहनचालक करत आहेत.
सेकंदाने जीव वाचला तर
झाडाची एक फांदी मोटरसायकलच्या टाकीवर तर दुसरी चालकाच्या पाठीमागे शिटवर पडली.त्यामुळे चालक दाऊखान हा दोन फांद्याच्या मधे पोकळीत सुरक्षित राहीला. मोटरसायकलवर झाडाचा बोजा पडल्यामुळे मोटरसायकल तशीच उभी होती.त्यामुळे दोन्ही फांदीखालुन वाकुन तो बाजुला निघाला. एक सेकंद जरी मागे पुढे झाला असता तर फांदी डोक्यात पडली असती.एका सेकंदाने जीव वाचाल. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय या घटनेत आला.
केंद्र शासनाच्या हॅम २ योजनेतून शिराळा ते आष्टा या तीस किलोमिटर रस्त्याचे रूंदीकरणासह काँक्रिटीकरण काम मंजूर झाले आहे.या कामातील शिराळा ते लाडेगांव पर्यंतचा रस्ता मशिनने उकरला आहे.पावसाळ्यापूर्वी रस्त्याची एकाबाजूचे काँक्रिटीकरण करायला हवे.अशा घटना घडू नये म्हणून रस्त्याच्या कडेला असणारी धोकादायक झाडे काढून घ्यावीत.
अमोल पाटील.(कापरी नागरिक)
0 Comments