शिराळा,ता..२३ :गिरजवडे (ता. शिराळा) येथील लाेकनियुक्त सरपंच सचिन देसाई यांच्यारील अविश्वास ठराव तीन चतुर्थांवश मतदान न झाल्याने तहसीलदार शामला खोत पाटील यांनी फेटाळला.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) कार्यकार्त्यांच्यासह इतर नागरिकांच्यात उत्साह निर्माण झाला आहे.
आज शुक्रवारी सरपंच सचिन देसाई यांच्यावरील अविश्वास ठरावा बाबत विशेष ग्रामपंचायत सदस्यांची सभा तहसीलदार शामला खोत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती.यामधे ठरावाच्या बाजूने तीन चतुर्थांश मतदान न झाल्याने हा ठराव फेटाळला गेला.
१५ मे राेजी गिरजवडे येथील पाच ग्रामपंचायत सदस्यांनी लाेकनियुक्त सरपंच सचिन देसाई हे विश्वासात घेऊन काम करत नाहीत असा ठपका ठेवून तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठरावा बाबत प्रस्ताव दाखल केला होता..सन २०२२ राेजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) सचिन देसाई हे लाेकनियुक्त सरपंच म्हणून १५५ मतांनी निवडून आलेले हाेते. सध्या भाजपाचे पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) दोन सदस्य असे राजकीय बलाबल आहे. एक आरक्षित रिक्त जागा आहे. उपसरपंच माेहन मुळीक,सदस्य अजय पाटील,इंदूबाई सावंत, आत्माराम शेळके, स्वप्नाली नलवडे यांनी ठरावाच्या बाजूने तर सरपंच सचिन देसाई व संगीता मुळीक यांनी ठरावा विरोधी मतदान केले. हात वर करून मतदान घेण्यात आले.
गिरजवडे गावाच्या विकासासाठी सातत्याने मी प्रयत्नशील आहे .माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली.पण काहींनी राजकीय हेतूने षडयंत्र रचून माझी बदनामी करण्यासाठी अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला.पण आजच्या सभेत तो फेटाळला असल्याने माझ्यावरचा सामान्य लोकांचा विश्वास पुन्हा वृद्धिंंगत झाला आहे.मला पुन्हा सरपंच पदावर काम करण्याची संधी मिळाल्याने अशा प्रवृत्तींना एक मोठी चपराक बसली आहे.
सचिन देसाई (सरपंच )
0 Comments