शिराळा:जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे आम्ही सर्व नेते मंडळी हातात हात घालून पक्ष वाढीच्या दृष्टीने काम करून राष्ट्रवादीची मोठी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील संपर्क कार्यालयामध्ये सांगली जिल्ह्याचे नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी निशिकांत भोसले पाटील यांच्या यशवंत उद्योग समूहाच्यावतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक,अभिजीत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नाईक म्हणाले,सांगली जिल्ह्यामध्ये सुसंस्कृत वाटचालीचा वारसा लाभलेले सर्वांना बरोबर घेऊन जाणारे निशिकांत भोसले-पाटील यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन विश्वास दाखवला आहे.या विश्वासाला निश्चित साजेशी काम पाटील यांच्याकडून होईल.
निशिकांत पाटील म्हणाले,राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सांगली जिल्ह्याची अध्यक्ष म्हणून जबाबदारी देऊन माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आहे.तो निश्चित या पुढील काळात सार्थ ठरवू. उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपंचायत,जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व नेते मंडळींना बरोबर घेऊन यश संपादन करून राष्ट्रवादी पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार.
यावेळी विजय पाटील,प्रकाश पाटील,पांडुरंग गायकवाड, प्रा.भीमराव गराडे-पाटील,जे.बी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक,अभिजीत नाईक,माजी पंचायत समितीचे उपसभापती, सरपंच प्रल्हाद पाटील,संचालक रघुनाथ पाटील,विजय मुळीक,उत्तम निकम,महेश पाटील,पै.दत्तात्रय माने,वारणा कारखाना संचालक विजय पाटील, सचिन यादव,मदन पाटील,सरपंच प्रमोद पाटील,भगवान मस्के,स्वप्निल पाटील,नितीन पाटील,चंद्रकांत पाटील,विनायक शिंगटे,बाजीराव पाटील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments